प्रसूती झाल्यावर तिने बोट दाखवलं अन.., अपघात झाल्यापासूनच तो..

Spread the love

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना नागपूर परिसरातील रामटेक इथे समोर आलेली असून विजेची तार खांबावर पडल्यानंतर एका अल्पवयीन मुलीचा खांदा फॅक्चर झालेला होता. आई-वडिलांनी तिच्यावर वैद्यकीय उपचार तर केलेच मात्र एका गावठी जडीबुटीवाल्या बाबाकडे तिला घेऊन गेले आणि त्याने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले अखेर ही मुलगी गर्भवती राहिलेली असून मुलीला जन्म दिल्यानंतरच या जडीबुटीवाल्या बाबाचे नाव समोर आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , मनोहर सखाराम काठोके ( वय 63 राहणार महादुला तालुका रामटेक ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून पीडित तरुणी जेव्हा या जडीबुटीवाल्या बाबाकडे गेलेली होती त्यावेळी सतरा वर्षे होते. 2018 मध्ये ती कपडे कपडे वाळवण्यासाठी दोरीवर टाकत असताना घसरली आणि विजेच्या खांबावर पडली. तिचे दोन्ही हात आणि खांदे फॅक्चर झाले म्हणून तिच्यावर रुग्णालयात देखील उपचार सुरू होते सोबतच मनोहर याच्याकडून जडीबुटीच्या माध्यमातूनही उपचार सुरू होते.

मनोहर याने डिसेंबर 2019 पासून तिच्यावर उपचाराला सुरुवात केली. रोज सकाळी तो तिच्या घरी यायचा आणि दुपारी लेप लावून जायचा . ती अगतिक असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार देखील केले . 9 ऑगस्ट 2023 रोजी मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला दवाखान्यात नेण्यात आले त्यावेळी ती सात महिन्यांची गर्भवती असल्याची समोर आले.

सातवा महिना सुरू असल्याकारणाने गर्भपात होणे शक्य नव्हते म्हणून अखेरतेची 11 ऑगस्ट रोजी रुग्णालयात प्रसूती करण्यात आली त्यानंतर तिने आरोपीकडे बोट दाखवले आणि त्याला अटक करण्यात आली . दोन्ही हात फॅक्चर असल्याकारणाने आरोपी जेव्हा तिचे लैंगिक शोषण करायचा त्यावेळी तिला प्रतिकार करणे शक्य होत नव्हते त्याचा या नराधमाने फायदा घेतलेला आहे त्याच्या विरोधात पोलिसांनी बलात्कार आणि पॉक्सो कायदाअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे.


Spread the love