मालकीणबाईचा मोबाईल नोकराच्या हाती लागला अन.., महाराष्ट्रातील घटना

Spread the love

कोल्हापूरमध्ये एक अजब प्रकार सध्या समोर आलेला असून मालकिनबाईच्या मोबाईलवरून पेटीएम ॲप डाऊनलोड केले आणि त्यानंतर त्यांच्या बँकेच्या खात्यातील तब्बल एक लाख 44 हजार रुपयांची रोकड एका कामगाराने त्याच्या पत्नीच्या खात्यावर वळवलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , गौतम प्रेमसिंग पोवार ( राहणार केरले तालुका पन्हाळा ) असे आरोपी कामगाराचे नाव असून राजारामपुरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. लीला पांडुरंग इंचनाळकर ( वय 67 राहणार प्रतिभा नगर कोल्हापूर ) यांनी आरोपीच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे.

संशयित असलेला गौतम हा फिर्यादी यांच्या घरी घरकामगार म्हणून काम करत होता. त्याने तक्रारदार महिला यांची नजर चुकवून त्यांचा मोबाईल घेतला आणि 4 जानेवारी ते 30 एप्रिल 2023 पर्यंत वेळोवेळी असे करत सुमारे एक लाख 44 हजार रुपये त्याच्या बायकोच्या खात्यात वळवले. खात्यावरील पैसे कमी होत हा प्रकार लक्षात आलेला असून पैसे पाठवलेल्या नंबरची माहिती घेतली तेव्हा आरोपी घरातच असल्याचे त्यांच्या लक्षात आले.


Spread the love