महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार छत्रपती संभाजीनगर इथे समोर आलेला असून झोपेत असलेल्या मुलीला पेट्रोल टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुलीच्या आईसह एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . सिडको पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पीडित तरुणी ही वीस वर्षांची असून एका कंपनीमध्ये काम करत ती तिच्या कुटुंबीयांसोबत राहते. तिची आई ही शकुंतला अहिरे नावाच्या एका महिलेकडे कायम जात असते. जादूटोणा आणि धनलाभ याच्या आहारी मुलीची आई गेलेली असून त्यातून तिने हा प्रकार केल्याचे मुलीचे म्हणणे आहे.
21 ऑगस्ट रोजी ही तरुणी झोपेत असताना सकाळी साडेचारच्या सुमारास तिला अचानक पेट्रोल आणि काहीतरी जळत असल्याचा वास आला म्हणून तिने पांघरून बाजूला सरकवले त्यावेळी तिचे पांघरून जळत असल्याचे लक्षात आले. तिने आरडाओरडा सुरू केला आणि पांघरून फेकून दिले त्यावेळी तिची आई जवळच उभी होती मात्र तिने तिला कुठलीही मदत केली नाही.
तरुणीने त्यानंतर आईला विचारले त्यावेळी तिने मला मिसारवाडी येथील शकुंतला अहिरे हिने आर्थिक धनलाभ मिळावा म्हणून मुलीला जिवंत जाळून मारण्याचा सल्ला दिलेला होता. जर तू जिवंत जळून गेली असती तर मला आर्थिक धनलाभ झालेला असता आणि तुझ्या मुलाचे देखील चांगले झालेले असते असे आईने सांगितले. आईच्या विरोधात तक्रार देण्यासाठी मुलगी निघालेली असताना आईने तिला थांबवले मात्र काही वेळाने तरुणीने सिडको पोलीस ठाणे गाठत आई आणि शकुंतला अहिरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.