महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना मुंबईत समोर आलेली असून मावशीच्या मुलीने दहा ते बारा लोकांना सोबत घेत एका घरात घुसून तब्बल 52 लाख 56 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केलेला आहे. गावदेवी पोलिसात याप्रकरणी आरोपी महिलेसह दहा ते बारा जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , तक्रारदार महिला या सीए असून त्या भुलाबाई देसाई रोड परिसरात राहतात. त्या त्यांच्या मामाच्या शोकसभेसाठी गेलेल्या असताना त्यांच्या मावशीची मुलगी आणि इतर सुमारे दहा पुरुष आणि तीन महिला त्यांच्या घरात घुसल्या आणि तेथील नोकरांना धमकावून बाहेर काढले सोबतच 52 लाख 65 हजार रुपये घेऊन त्यांनी तेथून पलायन केले.
सदर बाब तक्रारदार महिला यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या महिलेसह इतर आरोपींना विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आरोपींनी त्यांच्याच घराला दुसरे कुलूप लावले आणि त्यामुळे घरात स्वतःच्याच घरात जाण्याचा रस्ता बंद झाल्याने मावशीने अखेर गावदेवी पोलिसात अखेर गुन्हा नोंदवलेला आहे.