पुण्यात एक खळबळजनक अशी घटना पिंपरीत समोर आलेली असून प्रेमसंबंधास नकार देणाऱ्या एका तरुणीवर ऍसिड फेकण्याची धमकी देण्यात आलेली आहे . आरोपीने तिचा विनयभंग करून तिला शिवीगाळ देखील केली. दिघी इथे 21 तारखेला ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , यश उर्फ करण संजय लोणारे ( वय 19 राहणार रहाटणी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून बुधवारी यश याने तिचा पाठलाग केला आणि तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या सोबत प्रेमसंबंध ठेव असे तो म्हणत होता मात्र तरुणीने नकार दिला म्हणून त्याने तिच्या तोंडावर ऍसिड फेकण्याची धमकी दिली. तरुणीच्या घरच्यांनी देखील त्याला समजावले मात्र तरी देखील तो अशाच पद्धतीचा त्रास देत असल्याने अखेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.