कंत्राटी चालकाला 4000 रुपये मागितले , पुण्यात सापळा रचला अन..

Spread the love

लाचखोरीचा एक अजब असा प्रकार पुण्यात समोर आलेला असून स्वारगेट परिसरात पुणे महापालिकेच्या व्हेईकल डेपोमध्ये चक्क कंत्राटी चालकांकडून 4000 रुपये लाच घेताना स्टार्टर पदावरील एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे. 23 तारखेला ही कारवाई करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , पांडुरंग साधू लोणकर ( वय 57 वर्ष ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याच्या मालमत्तेची देखील चौकशी आता सुरू करण्यात आलेली आहे. तक्रारदार व्यक्ती कंत्राटी कामगार म्हणून काम करतो मात्र त्याला दररोजची नेमणूक मिळावी म्हणून लोणकर याने त्याच्याकडे चार हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर सापळा रुचून लोणकर याला लाच घेताना ताब्यात घेण्यात आलेले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शितल जाणवे या प्रकरणी पुढील तपास करत आहेत .


Spread the love