शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार खराडी परिसरात समोर आलेला असून कौटुंबिक वादातून पत्नीवर चाकूने वार केले आणि त्यानंतर तिचा खुनी पती आरोपी अखेर चंदननगर पोलिसात स्वतःहून हजर झाला.
उपलब्ध माहितीनुसार , लक्ष्मी केशव सीताफळे ( वय 40 राहणार लेबर कॅम्प पाटील बुवा नगर खराडी ) असे याप्रकरणी मयत महिला यांचे नाव असून त्यांचा पती केशव भीमराव सिताफळे ( वय 45 ) याला अटक करण्यात आलेली आहे . कौटुंबिक कारणावरून वाद झाल्यानंतर आरोपी केशव याने पत्नीला शिवीगाळ केली आणि त्यानंतर चाकूने तिचा गळा चिरला . पत्नी मयत झाल्यानंतर आरोपी स्वतःहून चंदननगर पोलिसात दाखल झालेला आहे .