प्रदीप कुरुलकर बाहेर आला तर काय होईल ? सरकारी वकील म्हणाले की..

Spread the love

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपावरून अटकेत असलेला डीआरडीओचा संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर याच्या जामीनला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने न्यायालयात कडाडून विरोध केलेला असून त्याला जामीन मिळाला तर तो साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो किंवा पुन्हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क करू शकतो असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे.

डॉक्टर प्रदीप कुरुलकर याच्यातर्फे न्यायालयात जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी करण्यात आली त्यावेळी एटीएसतर्फे वकील विजय फरगडे यांनी त्यांचे लेखी म्हणणे न्यायालयात सादर केलेले होते. डॉक्टर कुरुलकर हा डीआरडीओमध्ये मोठ्या पदावरील अधिकारी असून त्याला जामीन दिला तर तो साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता आहे किंवा पुन्हा तो पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेशी देखील संपर्क करू शकतो याची देखील शक्यता नाकारता येत नाही असे सरकारी वकिलांच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.

आरोपी प्रदीप कुरुलकर याने त्याच्या मोबाईलमधील सर्व डाटा नष्ट केलेला असून तो परत मिळवण्यासाठी त्याचा मोबाईल आता गुजरातमधील न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्याचे गरजेचे आहे असे देखील सरकारी वकील यांनी म्हटले त्यानंतर या अर्जाला न्यायालयाने मंजुरी दिलेली आहे.


Spread the love