नाव ‘ गोकुळ लॉज ‘ अन आत भलतेच धंदे , पोलीस पोहचले

Spread the love

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लॉजच्या आडून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची प्रकरणे समोर येत असून असेच आणखीन एक प्रकरण सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ शहराजवळ समोर आलेले आहे. गोकुळ लॉज नावाने हे लॉज सुरू होते मात्र तिथे प्रत्यक्षात कुंटणखाना सुरू होता सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , विनोद गोविंद अग्रवाल ( वय 52 वर्ष राहणार धनगरवाडी शिरवळ तालुका खंडाळा ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याच्यासोबत एक महिला देखील सध्या अटकेत आहे. आरोपी व्यक्तींनी गोकुळ लॉजवर अनैतिक व्यवसाय करण्यासाठी अनैतिक देह व्यवसाय करण्यासाठी काही मुली आणि महिला ठेवलेल्या होत्या. मागणी केल्याप्रमाणे त्या ठिकाणी आरोपी परिसरातील मुली आणि महिलांना बोलावून देखील घ्यायचे. गुप्त सूत्रांच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना माहिती मिळाली आणि त्यानंतर पथकाने कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतलेले आहे.


Spread the love