सोशल मीडियावर फसवणुकीचा एक अजब प्रकार सध्या बीड जिल्ह्यात समोर आलेला असून व्हाट्सअपवर मुला मुलींचा खोटा बायोडाटा पाठवायचा त्यानंतर लग्न जुळवून देण्यासाठी पाच हजार रुपये रक्कम उकळायची असा प्रकार करणाऱ्या एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बीडच्या सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केलेला असून सदर महिलेकडे दहा मुली अशाच पद्धतीचे खोटे कॉल आणि मेसेज करण्यासाठी चक्क जॉब करत होत्या. राज्यातील हजारो व्यक्तींना आतापर्यंत त्यांनी मेसेज आणि कॉल केले असून किती जणांची फसवणूक केली याचा तपास सुरू आहे.
उपलब्ध माहितीनुसार , शितल सुनील गजघाटे ( वय 34 राहणार नागपूर ) असे महिलेचे नाव असून बीडमधील एका लिपिकाला महिलां लिपिकाला मेसेज आलेला होता त्यामध्ये एका मुलाचा बायोडाटा पाठवण्यात आलेला होता. तक्रारदार यांनी मुलाचा पत्ता विचारला तर त्यांना नोंदणीसाठी 3500 आणि नंतर जीएसटी साठी पंधराशे असे पाच हजार रुपये सांगण्यात आले. महिला लिपिक यांनी पेमेंट केल्यानंतर कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.