गेम झाला रे.. प्रेयसीच्या माहेरी बेडरुमध्ये गेला खरा पण पुढे जे घडलं

Spread the love

देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून आपण आपल्या प्रेयसीसोबत लग्न करू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर देखील त्यांच्या अनैतिक संबंधात अथवा प्रेमात कुठलाही अडथळा आला नाही . विशेष म्हणजे या प्रकरणातील प्रेयसी ही चक्क विवाहित महिला होती त्यानंतर तिला भेटण्यासाठी म्हणून तिचा प्रियकर रात्री तिच्या घरी जायचा मात्र त्यावेळी तिच्या घरच्यांना जाग आली आणि त्याला बेदम मारहाण करण्यात आली. उत्तर प्रदेशातील बस्ती मधील मोहम्मदपुर येथील ही घटना आहे.

मनताशा नावाच्या एका तरुणीचे लग्न बलरामपुर येथील रहिवासी असलेला रिजवान याच्यासोबत झालेले होते. लग्नाच्या काही दिवसातच नवऱ्याला तिचा आधीचा प्रियकर असल्याचे समजले आणि त्यानंतर त्यांच्यात भांडण झाले मात्र तरीदेखील ती आणि तिचा प्रियकर अहमद हे अनेकदा भेटत असायचे गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या फोनवर बोलणे सुरू होते म्हणून अखेर पतीने तिला माहेरी पाठवून दिले. धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी या प्रियकराला मारहाण करण्यात आली यावेळी त्याच्या विवाहित प्रेयसीनेदेखील त्याची बाजू घेणे सोडून दिले आणि घरात घुसून तो आपल्यासोबत अत्याचार करत होता अशी फिर्याद पोलिसात दिलेली आहे.

माहेरी आल्यानंतर मनताशा घरी एकटीच असायची त्यामुळे तिचा प्रियकर तिला रात्रीच्या सुमारास भेटायला आला त्याचवेळी घरातील काही सदस्यांनी त्याला रंगेहाथ पकडले आणि बेदम मारहाण केली. नवऱ्याबरोबर विवाहबाह्य संबंधातून एक तर सासर सोडून माहेरी निघून आली आणि तरीदेखील माहेरी आल्यावरही तिचा प्रियकर तिच्या बेडरूममध्ये सापडल्यानंतर तिचे कुटुंबीयच काय पण गावकऱ्यांनी देखील रिजवान याला बेदम चोप दिलेला आहे. मनताशा हीने देखील लगेच भूमिका बदलत त्याच्या विरोधात फिर्याद दिलेली असून त्याला अटक करण्यात आलेली आहे.


Spread the love