महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना छत्रपती संभाजीनगर परिसरातील वाळूज इथे समोर आलेली असून वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दिराने धमकी देत भावजयीवर बलात्कार केलेला आहे. लिंबे जळगाव तालुका गंगापूर येथील ही घटना असून सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीत दिराला गुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , पीडित महिलेचा पती हा एका गुन्ह्यांमध्ये कारागृहात गेलेला असून पीडित महिलेसह आरोपी दिर लिंबेजळगाव येथील एका घरात एकत्र राहतात. 14 ऑगस्ट रोजी रात्री बाराच्या सुमारास आरोपी दिराने भावजयीला झोपेतून उठवले आणि पाठीमागील खोलीत येण्यास सांगितले.
तक्रारदार महिला असलेली भावजयी पाठीमागील खोलीत गेली त्यावेळी आरोपीने तिला पतीला जामिनावर सोडवेल असे आश्वासन दिले आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर आरोपीने बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला मात्र त्यानंतर देखील त्याने तीन ते चार वेळेस तिच्यावर अत्याचार केलेला आहे असे महिलेचे म्हणणे आहे.
30 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा आरोपी भावजयी जवळ आला आणि त्याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तिने नकार देत अखेर वाळूज पोलीस ठाणे गाठत त्याच्याविरोधात तक्रार दिलेली असून वाळुज पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे.