महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना ठाण्यात समोर आलेली असून जबरदस्तीने एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावण्यात आल्याचा प्रकार ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाणे हद्दीत समोर आलेला आहे. 42 वर्षे नवरदेव आणि वडिलांसह आठ जणांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पाच जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , ठाण्यातील बाळकुम परिसरात एका 14 वर्षीय मुलीचा लग्नाला विरोध होत असताना देखील जबरदस्तीने तिचा बालविवाह लावला जात असल्याची माहिती गुप्त सूत्रांच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली होती . मुलीच्या आईचे निधन झालेले असून त्यानंतर तिचा विवाह लावण्याचा घाट काही व्यक्तींनी प्लॅन केलेला होता.
धक्कादायक बाब म्हणजे या अल्पवयीन मुलीचा विवाह नवी मुंबई येथील लक्ष्मण गुजर नावाच्या एका 42 वर्षीय तरुणासोबत जुळवण्यात आलेला होता. लग्नात नवरदेव हा एक लाख रुपये दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि लग्न सोहळ्याचा देखील खर्च करणार होता. सदर प्रकरणी 22 ऑगस्ट रोजी पीडित तरुणीचे वडील पीडित मुलीचे वडील काकी आणि इतर नातेवाईकांसोबत एकूण आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नवरदेव लक्ष्मण , त्याचा चुलत भाऊ काळुराम गुजर , नरेश गुजर आणि विकास गुजर सोबत इतरांना अटक करण्यात आलेली आहे .