पुण्यात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून एका अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून त्याचे फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून तब्बल तीस लाख रुपये उकळण्यात आलेले आहेत. मुंढवा परिसरातील ही घटना असून दोन महिलेसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर प्रकरणी एका 19 वर्षांच्या तरुणीने मुंढवा पोलिसात फिर्याद दिलेली असून आरोपी अरबाज हनीफ सिप्पी ( वय 24 ) , हनीफ इस्माईल सिप्पी ( वय 40 ) यांच्यासह दोन महिलांच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फेब्रुवारी 2019 पासून तर ऑगस्ट 2023 पर्यंत वारंवार हा प्रकार ठाणे आणि लोणावळा इथे घडलेला आहे.
आरोपी अरबाज याने फिर्यादी तरुणीसोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध प्रस्थापित केले आणि या प्रकाराचे काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ देखील मोबाईलमध्ये काढले. तरुणीने विरोध केला त्यावेळी त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि फोटो व्हायरल करण्याची देखील धमकी दिली त्यामुळे पीडित तरुणी ही काही काळ गप्प राहिली.
काही कालावधीनंतर आरोपीने फिर्यादी तरुणीला आई-वडिलांच्या खात्यावरील पैसे आणि एफडी मोडून पैसे आणि सोन्याचे दागिने गहाण ठेवून पैसे मागण्यास सुरुवात केली आणि एकूण 30 लाख रुपये स्वतःच्या आणि आई-वडिलांच्या खात्यावर त्याने ट्रान्सफर करून घेतले. आपली फसवणूक झाल्याची जाणीव होताच तरुणी पोलिसात पोहोचलेली आहे.