शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून आता चक्क व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीपर्यंत प्रकरणे पुण्यात समोर येऊ लागलेली आहेत. फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक चौक परिसरात व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून जप्त केलेल्या उलटीची किंमत ही तब्बल पाच कोटी रुपये आहे.
उपलब्ध माहितीनुसार , विश्वनाथ गायकवाड असे आरोपी व्यक्तीचे नाव असून फर्ग्युसन रस्त्यावरील एका कॅफेच्या पाठीमागे एक व्यक्ती बेकायदेशीररित्या व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी येणार आहे याची माहिती पोलिसांना मिळालेली होती त्यानंतर कारवाई करत आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्याची बॅग पाहिल्यानंतर तपासणी केली त्यावेळी हा प्रकार समोर आला.
व्हेल माशाच्या उलटीचा अवैध व्यवसाय गेल्या काही वर्षांपासून फोफावत असून या उलटीचा वापर अतिउच्च पद्धतीची सुगंधी द्रव्य तसेच परफ्युम बनवण्यासाठी केला जातो. सुगंधी अगरबत्तीसाठी देखील त्याचा वापर होत असून उलटीमुळे परफ्युमचा हा सुगंध अधिक काळ टिकतो. एक किलो उलटीमध्ये तब्बल दहा हजार लिटर महागडे अत्तर आणि परफ्युम बनवले जातात त्यामुळे हजारो कोटींचा हा व्यवसाय गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेला आहे.
व्हेल माशाची उलटी किंवा व्हेल माशाचा कुठलाही अवयव जवळ बाळगणे हा वन कायद्यानुसार गुन्हा असून महाराष्ट्राला कोकण किनारा लाभलेला असला तरी आता अशा पद्धतीची देखील प्रकरणे समोर येऊ लागल्यानंतर ही चिंतेची बाब आहे सदर प्रकारात आरोपी सिद्ध झाला आरोपीवर गुन्हा सिद्ध झाला वेळ कमीत कमी तीन वर्षांचा तुरुंगवास आणि सात वर्षांची जास्तीत जास्त सत्तमजुरीची शिक्षा होऊ शकते.