देशात एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना कर्नाटकमध्ये समोर आलेली असून ,’ मयत वडिलांवर अंत्यसंस्कार करायचे असतील तर करा नाहीतर मृतदेह फेकून द्या पण आम्हाला उगीच त्रास देऊ नका. आम्ही तुम्हाला उपचार द्यायला सांगितले नव्हते ‘, असे मयत परदेशात शिकणाऱ्या एका पोटच्या मुलीने म्हटलेले आहे. मूलचंद शर्मा असे मयत दुर्दैवी व्यक्तीचे नाव असून गेली काही वर्ष पुण्यात ते बँक मॅनेजर म्हणून काम करत होते.
मूलचंद शर्मा हे मूळचे कर्नाटकातील निपाणी परिसरातील रहिवासी असून पुण्यातील एका बँकेत काही वर्ष मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांची दोन्ही मुले परदेशात उच्च पदावर नोकरी करत असून मुलगा दक्षिण आफ्रिकेत तर मुलगी कॅनडामध्ये नोकरी करते . मूलचंद शर्मा यांना काही दिवसांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला मात्र तरीदेखील त्यांची मुले त्यांना भेटण्यासाठी आली नाहीत आणि ते कर्नाटकात एकटे राहत होते.
एक कंत्राटी कामगार लॉजमध्ये त्यांची सेवा करत असायचा मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि अशात कामगारांचे कंत्राट संपले आणि तो शर्मा यांना सोडून निघून गेला. ज्या लॉजमध्ये ते राहत होते त्या लॉजमालकाने तब्येत खराब झाल्यावर चिकोडी पोलिसांना याप्रकरणी माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेत सरकारी रुग्णालयात दाखल केले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांच्या दोन्ही मुलांना फोन लावण्याचा प्रयत्न केला मात्र मुलांचे जे काही वर्तन होते ते पोलिसांच्या ही कल्पनेपलीकडचे होते.
मुलीला फोन केल्यानंतर मुलीने तुम्हाला आम्ही आमच्या वडिलांना उपचार द्यायला सांगितले नव्हते अंत्यसंस्कार करायचे असतील तर करा नाहीतर मृतदेह फेकून द्या फक्त आम्हाला उगीच त्रास देऊ नका , असे म्हटले त्यानंतर अखेर नागरमुनोळी ग्रामपंचायत आणि पोलीस यांच्या मदतीने शर्मा यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.