इराणींची दहशत थांबणार कधी ? आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर चक्क..

Spread the love

महाराष्ट्रात सध्या आरोपींना कायदा सुव्यवस्थेचे भय राहिले आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत असून डोंबिवली परिसरातील आंबिवली येथे इराणी वस्तीत आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे. मुंबई येथील डीएननगर पोलीस एका गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आलेले होते त्यावेळी पोलिसांवर दगडफेक देखील करण्यात आलेली आहे मात्र पोलिसांनी पर्वा न करता आरोपीला गजाआड केलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , फिरोज खान असे आरोपीचे नाव असून सदर प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेला आहे. अंधेरी येथील एका व्यक्तीला तोतया पोलिसाने गंडा घातलेला होता. ऑगस्ट महिन्यात ही घटना घडल्यानंतर डीएन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी चोराचा शोध सुरू केला त्यावेळी या प्रकरणातील आरोपी असलेला फिरोज खान हा अशा प्रकरणात सराईत गुन्हेगार असून कल्याणी येथील आंबिवली परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागलेली होती.

त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी पद्धतशीरपणे फिल्डिंग लावत एका बुरखाधारी महिलेला तिथे पाठवले. तिच्यासोबत काही पोलीस देखील होते आणि त्यावेळी फिरोज कुठे आहे याचा शोध सुरू असताना फिरोज एका सलूनमध्ये दाढी करताना आढळून आला. पोलिसांनी संशय येऊ नये म्हणून पोलिसांची गाडी न आणता शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी गाडी आणली होती.

कारवाईला सुरुवात करताच काही आरोपींनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरू केले. पोलिसांनी हा हल्ला परतावून लावत आरोपीला कुठलीही पळून जाण्याची संधी दिली नाही आणि भरवस्तीतून त्याची वरात काढत त्याला जेरबंद केलेले आहे. फिरोज याच्या विरोधात आतापर्यंत तब्बल 35 गुन्हे दाखल आहेत गेल्या वीस वर्षांपासून इराणी वस्तीत घुसून कारवाई करण्यास भीतीने पोलीस टाळाटाळ करत असतात. एकदा पोलिसावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला तर एकदा पोलिसांना गोळीबार देखील करावा लागलेला होता. इराणी वस्तीतील चोरट्यांची दहशत कधी थांबणार ? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.


Spread the love