सायबर कॅफेत ‘ नको तो ‘ प्रकार , बारामतीत पोलिसांना समजलं अन ..

Spread the love

सायबर कॅफेच्या आतमध्ये अनेक गैरप्रकार होत असल्याच्या अनेक घटना यापूर्वी देखील समोर आलेल्या असून बारामती इथे नागरिकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी एका सायबर कॅफेवर मंगळवारी कारवाई केली त्यावेळी सायबर कॅफेमध्ये पडदे लावून पार्टिशन केलेल्या जागेत अल्पवयीन मुले मुली अश्लील चाळे करत असल्याचे आढळून आलेले आहे. संबंधित सायबर कॅफेच्या चालकावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , बारामती तालुका पोलिसांसोबत निर्भया पथक यांनी ही कारवाई संयुक्तपणे केलेली असून कॅफे ग्राउंड विद्या कॉर्नर येथे अचानकपणे तपासणी केली त्यावेळी हा प्रकार समोर आला. सायबर कॅफेचा मालक असलेला सुहास तानाजी कदम आणि मॅनेजर असलेला मयूर बाळू कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून इतरही सायबर कॅफेवर कारवाईची मागणी बारामतीत जोर पकडते आहे.

बारामतीमधील एमआयडीसी चौक परिसरात अनेक सायबर कॅफे सुरू करण्यात आलेले असून ज्यामध्ये महाविद्यालयीन मुला-मुलींना एकत्र जवळजवळ बसून गप्पा मारता येतील अशा उद्देशाने पार्टिशन करत प्रायव्हसी निर्माण करण्यात आलेली आहे. कॅफेमध्ये बहुतांश तरुण-तरुणी याच उद्देशाने जात असून सायबर कॅफेमध्ये अनेक गैरप्रकार घडत आहेत. जालना येथे सायबर कॅफेमधील अत्याचारातून एक तरुणी गर्भवती राहिल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आलेले होते.

पोलीस निरीक्षक मोरे यांनी याप्रकरणी पालकांनी सुद्धा या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे . सर्व कॅफे चालकांना नोटीसा बजावण्यात आलेल्या असून कॅफेमधील पार्टिशन काढून टाकली नाही तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांचे परवाने देखील रद्द करण्यात येईल येथील अशी माहिती देण्यात आलेली आहे.


Spread the love