पुणेकर हॉटेलचालक असे का वागता ?, बिलात तफावत वाटली म्हणून..

Spread the love

गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरातील हॉटेल व्यावसायिक यांना नक्की काय झालेले आहे हे लक्षात येत नसून किरकोळ कारणावरून चक्क ग्राहकांनाच मारहाण करण्याचे प्रकार समोर येत आहेत. अशीच एक घटना वारजे परिसरात समोर आलेली असून हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर बिलात तफावत वाटली म्हणून वाद झाल्यानंतर हॉटेल मालक आणि वेटर यांनी ग्राहकांनाच मारहाण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , वेदांती हॉटेलचे मालक शंकर अण्णा आणि तेथील मॅनेजर सोबतच चार ते पाच वेटर यांच्या विरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राधेश्याम रामराव एकशिंगे ( वय 23 राहणार वारजे ) यांनी या प्रकरणी फिर्याद दिलेली आहे

वारजे येथील वेदांती हॉटेल इथे राधेश्याम त्यांचे मित्र रघुनाथ डफळे , सुनील पवार हे जेवण करण्यासाठी गेले होते त्यावेळी बिलात तफावत होती म्हणून त्यांनी मॅनेजर यांना जाब विचारला. मॅनेजर आणि वेटर यांच्यात वाद झाला त्यानंतर हॉटेल मालक आणि व्यवस्थापक तसेच कामगारांनी आलेल्या ग्राहकांना बेदम मारहाण केली त्यानंतर प्रकरण पोलिसात पोहोचलेले आहे.


Spread the love