महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना सोलापूर शहरात समोर आलेली असून नात्याला काळिमा फासणाऱ्या या प्रकारात चक्क अल्पवयीन मुलीच्या वडिलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अवघ्या आठ वर्षांच्या मुलीसोबत तिच्या चुलत्याने अश्लील वर्तन केले मात्र या प्रकरणी ही माहिती देखील मुलीच्या वडिलांनी लपवून ठेवली म्हणून अखेर मुलीच्या आईने तिचा दीर , पती यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे. जेलरोड पोलिसात ही फिर्याद देण्यात आलेली असून मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आलेली आहे.
पोलिसात दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की , शहरातील एका भागामध्ये पीडित मुलीची आई तिच्या तीन मुली आणि पतीसोबत राहते. तिन्ही मुली झाल्यानंतर पतीशी भांडण होऊन 12 ऑगस्टपासून पीडित मुलीची आई आणि मुली या वेगळ्या राहतात. कुटुंबाच्या उपजीविकेसाठी म्हणून मुलींची आई एका रुग्णालयात नोकरी करत असून मुलीला त्रास होऊ लागला म्हणून तिने चौकशी केली त्यावेळी चुलत्याने तिच्यासोबत अश्लील वर्तन केल्याचे सांगितले. नवऱ्याला हा प्रकार माहिती होता मात्र तरी देखील त्याने ही बाब लपवून ठेवली म्हणून अखेर मुलीच्या आईने तिचा नवरा आणि दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांनी तात्काळ मुलीच्या वडिलांना अटक केलेली आहे.