महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना धाराशिव जिल्ह्यात समोर आलेली असून लग्नाचे आमिष दाखवत एका व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केले आणि त्यानंतर लग्नासाठी तिने विचारणा केली तर त्याने तिचे वय कमी आहे असे सांगत लग्नाला नकार दिलेला आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून प्रियकर आणि त्याचे आई वडील आणि दोन भाऊ यांच्या असे एकूण पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .
उपलब्ध माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेली ही तरुणी मुलगी धाराशिव इथे नर्सरीचे शिक्षण घेत होती याच दरम्यान तिचे हिरालाल इंगळे नावाच्या एका तरुणासोबत प्रेम संबंध जुळले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली आणि त्यानंतर त्या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले.
सदर मुलीला भेटण्यासाठी म्हणून आरोपी हिरालाल हा धाराशिव इथे आलेला होता आणि त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिला फिरण्यासाठी म्हणून पुण्याला देखील घेऊन गेला. तिथे घेऊन गेल्यावर त्याने तरुणीचा विश्वास संपादन केला आणि पुण्यातील एका लॉजवर तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे तिच्यासोबत एक अपार्टमेंट भाड्याने घेऊन तो तिच्यासोबत राहिला मात्र तरीही घरच्यांना याची कल्पना नव्हती.
फ्लॅटवरती सतत तिच्यावर अनेकदा अत्याचार करण्यात आला त्यानंतर अखेर तिची मासिक पाळी चुकली आणि तिने तपासणी केली त्यावेळी ती अडीच महिन्याची गर्भवती असल्याचे लक्षात आले. आरोपी प्रियकरांनी तिला तुझे वय लहान आहे तो आता गर्भपात करून टाक असे सांगत गर्भपात देखील केला आणि त्यानंतर त्याने तिला लग्नाला नकार दिला . उमरगा पोलीस ठाण्यात या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.