पुणे हादरलं..पोलीस शिपायाकडूनच सहकारी महिलेवर अत्याचार

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून शहर पोलीस दलातील एका महिला पोलीस शिपायाला चक्क कोल्ड्रिंकच्या माध्यमातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सहकारी पोलीस शिपायाने अत्याचार केलेला आहे. चार तारखेला ही घटना समोर आलेली असून आरोपी पोलिसांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न आणि मौल्यवान चीज वस्तू लुबाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल खडक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , दीपक सीताराम मोघे ( राहणार स्वारगेट पोलीस वसाहत ) असे संशयित पोलीस शिपायाचे नाव असून पीडित महिला आणि मोघे यांची पूर्वीपासून ओळख आहे. कोरोना काळात संशयित व्यक्ती हा पीडित महिलेच्या घरी जेवण्यासाठी जात असायचा त्यावेळी त्याने कोल्ड्रिंकमध्ये गूंगीचे औषध देऊन तिच्यावर अनेकदा अत्याचार केले आणि त्याची क्लिप बनवून तिला ब्लॅकमेल करू लागला, असे पीडित महिलेचे म्हणणे आहे .

पीडित महिला गेल्या महिन्यांपासून आरोपीच्या या ब्लॅकमेलिंगला कंटाळून गेलेली होती. आरोपी हा तिला फोटो आणि व्हिडिओ दाखवत त्याच्याआधारे ब्लॅकमेल करत शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी लॉजवर घेऊन जात असायचा त्यावेळी त्याने पिस्तुलाचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार केला सोबतच तिच्या घरातील सहा तोळे सोन्याचे दागिने मोबाईल फोन आणि लॅपटॉप देखील त्याने गायब केला , असे पीडित महिलेचे म्हणणे आहे.


Spread the love