देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सध्या हरियाणात समोर आलेले असून शुक्रवारी एका पत्नीने तिचा पती आणि तीन मुलांची हत्या केलेली आहे आणि त्यानंतर ती घटनास्थळावरून पळून गेलेली आहे. जाताना बाहेरील दरवाजा बंद करून ती गेली आणि शनिवारी हे प्रकरण समोर आले.
धक्कादायक बाब म्हणजे फरार महिलेचा नवरा ‘ नको त्या ‘ अवस्थेत सापडलेला असून पोलीस प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार पत्नीने प्रियकराच्या मदतीने हा प्रकार केल्याचे दिसून येत असून चारही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिलेले आहेत. आरोपी महिला ही अद्यापपर्यंत हाती आलेली नाही.
मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी आरोपी महिलेच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला त्यावेळी नवरा नग्न अवस्थेत गळफास घेतलेल्या परिस्थितीत आढळून आला तर तीनही मुले बेशुद्ध पडलेली होती. हरियाणा राज्यातील नुह जिल्ह्यातील ही घटना आहे.
मयत पतीचे नाव जीतसिंह , मुलाचे नाव खिलाडी , मुलगी राधिका आणि प्रियांशू या सर्वांचा आरोपी महिलेने खून केल्याचा संशय असून महिलेवर पतीला शंका होती त्यामुळे अनेकदा या दांपत्यात भांडण देखील झालेले होते. अनेक वेळा पत्नी घरातून तीन चार दिवसांसाठी गायब व्हायची त्यानंतर ती पुन्हा माहेरी यायची. पतीने अनेकदा सांगितले मात्र तिच्यात कुठलीही सुधारणा झाली नाही आणि अखेर पत्नी सोडून इतर सर्वांनी यात प्राण गमावलेले आहेत.