कुणाच्या डोक्यात काय चालू असते हे कोणी सांगू शकत नाही असाच एक अत्यंत धक्कादायक असा प्रकार अमेरिकेमध्ये समोर आलेला असून एका महिलेने विक्षिप्तपणाची हद्द ओलांडलेली आहे. अत्यंत देखणी असलेल्या या तरुणीने तब्बल पाच लाख लोकांना विष देऊन मारण्याची भयंकर योजना आखली होती. तिचे वय अवघे 25 वर्ष असून तिचे नाव कॅटलीन आबनर्थी असे आहे. सुदैवाने तिचा हा प्लॅन यशस्वी झाला नाही.
पोलिसांनी तिला अटक केली त्यावेळी तिच्याकडे सुमारे दीड किलो झोंबी ड्रग्स आढळून आलेले आहे. झोंबी ड्रग्स हे हीरोइन प्रकरणात मोडत असून अमली पदार्थापेक्षा जवळपास 50 पट हे जास्त धोकादायक आहे. तिच्याकडून जप्त केलेल्या झोंबी ड्रग्समधून पाच लाख लोकांना ती अवघ्या काही क्षणात संपवू शकत होती. कॅटलीन ही इतकी विक्षिप्त आहे कि तिने डोळ्याच्या वरच्या बाजूला एक टॅटू बनवून त्यावर घोस्ट अर्थात भूत असे लिहिलेले आहे सुदैवाने पोलिसांनी तिला वेळेत अटक केली.