पुण्यात एक दुर्दैवी अशी घटना पिंपरीत समोर आलेली असून शेअर मार्केटमध्ये झालेल्या नुकसानीनंतर कर्जबाजारी झाल्यानंतर अखेर एका व्यक्तीने राहत्या घराच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेली आहे. शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास चऱ्होली फाटा इथे ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , समाधान दत्तात्रय आहेर ( वय 34 राहणार चऱ्होली फाटा मूळ राहणार बार्शी तालुका सोलापूर ) असे मयत तरुणाचे नाव असून समाधान हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचा. गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जबाजारी झाल्यानंतर तो नैराश्यात गेलेला होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली त्यामध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून आपण हा प्रकार करत आहोत कुणालाही दोषी ठरू नये असे म्हटलेले होते.
शनिवारी रात्री राहत्या घराच्या आठव्या मजल्यावरून त्याने उडी मारली त्यात गंभीर जखमी झाल्यानंतर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले मात्र तो त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झालेला होता. घटना घडली त्यावेळी त्याची पत्नी देखील माहेरी होती आणि आई वडील गावी गेलेले होते. त्याच्या पश्चात त्याला पत्नी आठ महिन्यांचा मुलगा , पत्नी आणि आई वडील आहेत.