पुण्यात निवृत्त बँक अधिकाऱ्याचेच ‘ 92 लाख ‘ गायब , ब्रिटिश सरकारचे नाव सांगत..

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून पिंपरी इथे बँकेतून एका मोठ्या पोस्टवरून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला फोरेक्स ट्रेडिंगचे आमिष दाखवत या अधिकाऱ्याची तब्बल 92 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे. अवघ्या दोन महिन्यात ही फसवणूक करण्यात आलेली असून हिंजवडी येथील हे अधिकारी रहिवासी आहेत.

उपलब्ध माहितीनुसार , मदन कोरे ( वय 62 ) असे या अधिकाऱ्याचे नाव असून ईशांत चोप्रा , विराज गायकवाड आणि इतर चार बँक खातेदारांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींसोबत तक्रारदार व्यक्ती यांची ओळख ट्रेडिंग करताना निर्माण झालेली होती त्यावेळी आरोपींनी तक्रारदार व्यक्ती यांना आपल्या जाळ्यात ओढले.

आरोपी व्यक्तींनी त्यानंतर ज्या कंपनीचा वरिष्ठ सल्लागार तो आहे त्या ठिकाणी तक्रारदार व्यक्ती यांचे अकाउंट आणि आयडी तयार केले त्यानंतर शेअर मार्केट त्यानंतर फोरेक्स ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत बँक खात्यावर वेळोवेळी पैसे घेतले . नफ्याची मागणी केली त्यावेळी त्यांना कर भरण्यास सांगितले . ब्रिटिश सरकारच्या नियमाप्रमाणे अधिक कर भरल्यानंतर नफा दिला जाईल असे सांगत आरोपींनी आपली अडवणूक केली असे म्हणत तक्रारदार व्यक्ती यांनी पोलिसात धाव घेतली आहे.


Spread the love