पुणे हादरलं..महावितरणच्या कर्मचाऱ्याचा अनैतिक संबंधास विरोध केल्याने खून

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून सिंहगड रोडच्या एका तरुणाची रायकर मळा परिसरात एका अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आलेली आहे. ज्याची हत्या करण्यात आली तो महावितरणचा कर्मचारी असल्याची देखील माहिती आहे.

उपलब्ध माहितीनुसार, गोपाळ कैलास मंडवे (वय ३२, रा. ओवी आंगण काॅलनी, जाधवनगर, रायकर मळा ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून सिंहगड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. अनैतिक संबंधास विरोध केल्याने हा खून झाल्याची प्राथमिक माहिती असून सिद्धांत दिलीप मांडवकर (वय १९, रा. धायरेश्वर मंदिराजवळ, धायरी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

गोपाळ मंडवे पर्वती उपविभागातील महावितरण केंद्रात वरिष्ठ तंत्रज्ञ होते आणि त्यांच्या ओळखीतील एका महिलेशी आरोपी मांडवकरचे अनैतिक संबंध होते म्हणून सोमवारी मांडवकर आणि मंडवे यांच्यात वाद झाला त्यावेळी मंडवे यांनी त्याला दुचाकीवरुन धायरीतील रायकर मळा भागात नेले आणि तिथे मांडवकरने त्याच्याकडील चाकूने मंडवे यांच्यावर वार केले त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे .

गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी धनंजय ताजणे यांना पसार झालेला मांडवकर कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी महाविद्यालय परिसरात थांबल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मांडवकरला पकडले. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, उपनिरीक्षक शाहीद शेख, प्रदीप राठोड, मॅगी जाधव, गणेश ढगे, शविाजी सातपुते, नारायण बनकर आदींनी ही कारवाई केली.


Spread the love