पुणे हादरले..वाघोलीच्या फ्लॅटवरील ‘ असली ‘ फसवणूक तिला सहन झाली नाही

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना पुणे इथे उघडकीस आली असून सोबत काम करणाऱ्या तीस वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिच्यासोबत अनेक वेळा शरीर संबंध ठेवले आणि नंतर मात्र लग्न करण्यास नकार दिला त्यामुळे तरुणीला फसवणूक झाल्याची जाणीव झाली आणि तिने पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पीडित तरुणीचे वय ३० वर्षे असल्याचे समजते .

उपलब्ध माहितीनुसार, रितेशकुमार राजेंद्र लाड (वाघोली) असे या आरोपीचे नाव असून तो आणि पीडिता एकाच ठिकाणी काम करतात. एकत्र काम करत असताना त्यांच्यात मैत्री झाली आणि तिचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि वेळोवेळी वाघोलीतील एका फ्लॅटवर घेऊन जात तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

काही दिवस उलटल्यावर पीडितेला तो टाळू लागला आणि त्यानंतर त्याने तिच्यासोबत लग्नास नकार दिला . आपली अशा पद्धतीने केलेली फसवणूक तरुणीला सहन झाली नाही आणि तिने तडक पोलीस स्टेशन गाठून आरोपीच्या विरोधात तक्रार दिली.सुरुवातीला हा गुन्हा मध्यप्रदेशातील खंडवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता मात्र तिथून तो लोणीकंद पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.


Spread the love