नवरा निघाला इतक्या मोठ्या मनाचा की, ‘ जा सिमरन जी ले अपनी जिंदगी ‘

Spread the love

सोशल मीडियावर सध्या एका प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून उत्तर प्रदेशातील मिर्जापुर येथील एका विवाहासंदर्भात हा विषय आहे. संतनगर भागात एका तरुणाचे लग्न हालिया भागातील गुलाबी नावाच्या तरुणीसोबत झालेले होते.लग्नानंतर काही दिवसातच गुलाबी हिचे शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत अनैतिक संबंध सुरू झाले. दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली आणि दोघेही तासंतास एकमेकाशी बोलत असायचे.

गुलाबी हिच्या प्रेमाची अनैतिक संबंधाची त्यानंतर परिसरात देखील चर्चा होऊ लागली आणि काही व्यक्तींनी याप्रकरणी गुलाबी हिच्या नवऱ्याला देखील याप्रकरणी आडून आडून पुसटशी कल्पना दिली. नवऱ्याने उलट सुलट चर्चांमध्ये लक्ष न देता याप्रकरणी डायरेक्ट गुलाबीला विचारले त्यावेळी गुलाबी हीने ‘ मी तुझ्यासोबत संसार करून सुखी नाही मला माझ्या प्रियकरासोबत लग्न करायचे आहे ‘ असे सांगितले.

गुलाबी हीचा निर्णय ऐकून वास्तविक तिच्या पतीला राग येणे आणि त्यानंतर भांडण होणे असे घडले असते मात्र गुलाबी हीचा पत्ती खूपच मोठ्या मनाचा निघाला आणि त्याने गावात गावकऱ्यांची बैठक बोलावली . गुलाबी आणि तिच्या प्रियकराने सर्वांसमोर आपले नाते कबूल केले आणि नवऱ्याने अखेर गुलाबीच्या लग्नाला मान्यता दिली आणि एका मंदिरात हा विवाह पार पडला. प्रियकराचे नाव राहुल असे असून लग्नानंतर गुलाबी लगेच राहुल याच्या घरी राहायला गेली. पोलिसात कोणतीही तक्रार याप्रकरणी दाखल करण्यात आली नाही.


Spread the love