पुणे हादरलं..चार वर्षांच्या मुलीला बसच्या आडोशाला नेलं अन..

Spread the love

पुण्यात एक अत्यंत संतापजनक असा प्रकार समोर आलेला असून एका तीस वर्षाच्या नराधम व्यक्तीने चार वर्षाच्या मुलीला आपल्यासोबत घेतले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करू लागला. कोथरूड पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडलेली असून आरोपी हा पीडित बालिकेला अंधारात घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलगी रडायला लागल्यानंतर हा प्रकार समोर आला त्यावेळी आरोपीला नागरिकांनी पकडून चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

उपलब्ध माहितीनुसार , राजेश चोरगे ( वय 30 वर्ष राहणार सागर कॉलनी बोराटे चाळ कोथरूड ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून चार वर्षांची मुलगी घरासमोर खेळत होती त्यावेळी आरोपी चोरगे याने तिला फिरायला घेऊन जातो असे सांगून नेले आणि सोसायटीच्या एका परिसरात एक बस लावलेली होती तिच्याजवळ तिला घेऊन गेला.

आरोपी हा बसच्या आडोशाचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करू लागला त्यामुळे मुलगी रडायला लागली त्यावेळी परिसरातील रहिवासी आणि मुलीच्या आजोबांनी आरोपीला पकडले आणि चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण करत असल्याची माहिती आहे.


Spread the love