‘ लिव्ह इन ‘ मध्ये राहून इतरत्र देखील , संशयाने मनात घर केलं अन ..

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण सध्या भिवंडी इथे समोर आलेले असून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचे इतरत्र संबंध असल्याच्या संशयातून प्रियकराने तिची हत्या केलेली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी हा परराज्यात पळून गेला त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्री फिरवत अखेर त्याला अवघ्या तीस तासात अटक केलेली आहे. भिवंडी पोलीस उपयुक्त नवनाथ ढवळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

उपलब्ध माहितीनुसार , शब्बीर दिलावर शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून 18 सप्टेंबर रोजी कोणगाव येथील गणेश नगर येथे एका खोलीतून दुर्गंधी येत होती त्यावेळी पथकाने तिथे धाव घेतली तेव्हा एका महिलेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आलेली होती.

महिलेच्या मैत्रिणीने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आणि त्यामध्ये मयत असलेली मधु प्रजापती हिचे तिचा मित्र शब्बीर दिलावर शेख याच्यासोबत रिलेशनशिप असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलचा तांत्रिक तपास सुरू केला त्यावेळी तो पश्चिम बंगाल येथे पळून गेल्याचे समोर आले.

महाराष्ट्र पोलिसांचे एक पथक आरोपीच्या अटकेसाठी पश्चिम बंगाल राज्यातील त्याच्या मूळ गावी दाखल झाले त्यावेळी आरोपी हा त्याच्या मूळ गावी देखील आढळून आला नाही आणि सासुरवाडीत पळून गेलेला होता. सारापुरला जिल्हा 24 इथे तो लपून बसलेला होता त्यावेळी त्याला ताब्यात घेण्यात आले . आपल्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून मधु हिचे इतरत्र अनैतिक संबंध असल्याचा आपल्याला संशय होता त्यातून आपण ही हत्या केलेली असल्याची त्याने कबुली दिलेली आहे.


Spread the love