महिलेचा इमारतीखाली संशयास्पद मृत्यू , ‘ लिव्ह इन ‘ वाला पोलीस हवालदार ताब्यात

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून मुंबईतील उच्चभ्रू वस्ती असलेल्या जुहू इथे एका इमारतीच्या खाली महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आलेला आहे. मयत महिलेचे एका पोलिसांसोबत अनैतिक संबंध होते अशी माहिती समोर आलेली असून ही आत्महत्या आहे की घातपात याची देखील परिसरात चर्चा सुरू आहे . महिलेचा मृतदेह आढळला त्यावेळी हा पोलीस कर्मचारी त्याच्या फ्लॅटमध्ये होता त्यामुळे त्याला देखील पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , जुहू येथील बसेरा नावाच्या इमारतीत राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आलेला आहे. महिला व्यवसायाने परिचारिका होती आणि महिलेचा प्रियकर हा त्याच्या फ्लॅटमध्ये दारूच्या नशेत होता . त्याला समजल्यानंतर तो खाली आला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला आणि अखेर या महिलेला कूपर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले मात्र तिचा मृत्यू झालेला आहे.

संशयित पोलीस हा मयत महिलेसोबत गेल्या काही दिवसांपासून एकत्र राहत होता. पोलीस कर्मचारी हा विवाहित असून महिलेचा पहिल्या पतीपासून घटस्फोट झालेला आहे आणि तिला दुसरे मुल आहे. महिलेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे की तिला कोणी ढकलून दिलेले आहे हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नसल्याने पोलीस हवालदाराला ताब्यात घेण्यात आलेले आहे.


Spread the love