संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडवून देत निवृत्त पोलीस अधिकारी यांच्या मुलाची गणेश विसर्जन मिरवणूकदरम्यान अमानुषपणे हत्या करण्यात आलेली होती . मयत व्यक्ती हा सेवानिवृत्त पोलीसाचा मुलगा होता आणि अनेक राजकीय नेत्यांच्या देखील संपर्कात असायचा. घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या 36 तासांच्या आत खुनाचा छडा लावलेला असून अनैतिक संबंधातून प्रेयसीने नवीन प्रियकराच्या मदतीने विजय याचा काटा काढल्याचे समोर आलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , विजय ढुमे असे मयत व्यक्ती यांचे नाव असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संशयित आरोपींचा शोध सुरू केलेला होता . तांत्रिक विश्लेषणात मयत व्यक्ती यांच्यासोबत जुने प्रेमसंबंध असणारी महिला सुजाता समीर ढमाल हिच्याकडे सखोल चौकशी केली त्यावेळी अखेर तिच्यापर्यंतच पोलिसांचा तपास येऊन थांबला.
आरोपी सुजाता हिने तिचा नवीन प्रियकर संदीप दशरथ तुपे ( वय 27 राहणार कांदलगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे ) याच्यामार्फत तिचा जुना प्रियकर विजय ढुमे यांच्या हत्येचा कट रचला असल्याचे समोर आलेले आहे. आरोपी महिला आणि तिचा नवीन प्रियकर दशरथ तुपे यांनी इतर पाच जणांना सोबत घेत ही हत्या केल्याचे समोर आलेले आहे.
विजय ढुमे असे मयत व्यक्ती याचे नाव तो सेवानिवृत्त पोलिसांचा मुलगा होता. शहरातील अनेक राजकीय नेत्यांसोबत देखील त्यांची उठबस होती आणि मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील त्याचे मैत्रीचे संबंध होते. शुक्रवारी संध्याकाळी सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत क्वालिटी लॉजमध्ये गेल्यानंतर तिथून बाहेर पडत असतानाच काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला विजय याचा जागीच मृत्यू झालेला होता. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यानच हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती मात्र पोलिसांनी विक्रमी 36 तासांच्या आत आरोपींना गजाआड केलेले आहे.