लोणावळ्यात पर्यटकांना नागडं करून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश , तीन महिला अन..

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार पुणे जिल्ह्यात समोर आलेला असून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि लोणावळा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलेले असून आरोपी हे लोणावळा इथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना कुऱ्हाडीने मारहाण करत त्यांचे कपडे मोबाईल आणि रोख रक्कम चोरी करत असायचे . दोन्ही आरोपी हे सरावलेले गुन्हेगार असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , राज सिद्धेश्वर शिंदे आणि ज्ञानेश्वर रामभाऊ लोकरे अशी आरोपी व्यक्तींची नावे असून स्थानिक न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन सहआरोपी अल्पवयीन असल्याकारणाने त्यांना येरवडा इथे निरीक्षण ग्रहात ठेवण्यात आलेले असून आरोपी लोणावळा परिसरातील कांतीनगर इथे पर्यटकांना हेरून त्यांना गाठून लूटमार करत असायचे . आरोपींनी एका अल्पवयीन मुलीला आणि महिलेला देखील पळून आणले आणि त्यांच्यावर बलात्कार करून मारहाण करून त्यांना देखील डांबून ठेवले होते या महिलेची आणि मुलीची देखील सुटका करण्यात आलेली आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर आरोपी राज शिंदे याने पर्यटकांना कुऱ्हाडीने आणि चाकूने मारून जबरदस्तीने त्यांचे पैसे आणि कपडे काढून घेत लुटमार केल्याची कबुली दिली असून आरोपींनी त्यांच्या घरात कामासाठी म्हणून एक महिला हिला देखील डांबून ठेवलेले होते. लोणावळा स्टेशनच्या परिसरात आरोपींनी तिला डांबून ठेवलेले होते त्यानंतर तिचा मोबाईल देखील आरोपींनी हिसकावून घेतला. रोख रक्कम आणि मोबाईल आरोपींनी हिसकावून घेतला. तिला मारहाण करत आरोपी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करायचे अशी ही माहिती समोर आलेली आहे.

पीडित महिलेसोबत दोन अल्पवयीन मुलांची ( एक मुलगा एक मुलगी ) यांची देखील सुटका करण्यात आलेली असून अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाशी संपर्क केला त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे आरोपींच्या विरोधात विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपींच्या टोळीमध्ये तब्बल दहा जणांचा समावेश असून त्यातील त्यात दोन अल्पवयीन , तीन महिला आणि पाच पुरुष यांचा देखील समावेश आहे इतर सहा आरोपी फरार असून दोन अल्पवयीन सध्या येरवड्यातील बालनिरीक्षण ग्रहात ठेवण्यात आलेले आहेत.


Spread the love