लातूर हादरले..तब्बल बारा वर्षे लहान प्रियकरासाठी तीन मुलांच्या आईने मर्यादा ओलांडल्या

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना लातूर इथे उघडकीस आली आहे. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील शिवणी या ठिकाणी एका महिलेनं आपल्यापेक्षा बारा वर्षे लहान असलेल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला आहे . मयत तरुणाला आधी दारू पाजली आणि त्यानंतर त्याचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी तातडीने यंत्रणा फिरवत अवघ्या चोवीस तासात आरोपीना बेड्या ठोकल्या असून किशोर विठ्ठल सुतार ( वय ४० ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे .

उपलब्ध माहितीनुसार , किशोर विठ्ठल सुतार हे शिवणी येथील रहिवासी होते तर त्यांची पत्नी असलेल्या मनीषाचे 12 वर्षींनी लहान असणाऱ्या अविनाश नवनाथ गुरने (21) याच्यासोबत सूत जुळलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यातील अनैतिक संबंधात त्यांनी सर्व मर्यादा पार केल्या मात्र पती किशोर यांना याबद्दल संशय आल्यावर पती पत्नीत यावरून वादावादी सुरु झाली. पत्नीने आपल्या पतीचे गाऱ्हाणे अविनाश याला सांगितले आणि अविनाश आणि मनीषा यांनी मिळून आणखी एक व्यक्ती धनाजी सूर्यभान वाघमारे (35) याला हाताशी घेत पतीला मारण्याचा प्लॅन केला.

मृत किशोर यांचा मनीषा हिच्याशी काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर या दाम्पत्याला तीन मुलं देखील झाली पण पती किशोर याला दारूचं व्यसन असल्याने मनीषा वैतागली होती त्यामुळे तिचे पाऊल वाकडे पडले आणि त्यातून संसारात अडचणी निर्माण झाल्या . बायकोचे विवाहबाह्य संबंध पतीला खटकू लागल्याने त्यांच्यात वाद होत असल्याने शिवाय पत्नी ही प्रियकराची बाजू घेत असल्याने पती किशोर यांनी देखील तिला त्रास देण्यास सुरुवात केली होती.

घटनेच्या दिवशी आरोपींनी किशोरला शुद्ध जाईपर्यंत दारू पाजली आणि गावापासून अर्धा किलोमीटर लांब एका शेतात नेऊन त्याची मफलरने गळा आवळून हत्या केली. खून झाल्यानंतर मृतदेह जवळच्याच एका शेतात टाकून त्यांनी पळ काढला. हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात या घटनेची उकल केली आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी मनीषासह साथीदार धनाजी याला अटक केली आहे मात्र प्रियकर अविनाश फरार असून त्याचा शोध सुरु आहे .


Spread the love