शारीरिक भुकेसाठी व्याकुळ तरुणीने केला दोन लहान बहिणींचा खून

Spread the love

देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सध्या उत्तर प्रदेशातील इटवाह इथे समोर आलेले असून बलराई नावाच्या गावामध्ये एका वीस वर्षीय तरुणीने प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास अडथळा नको म्हणून दोन लहान बहिणींचा चक्क खून केलेला आहे. आरोपी तरुणी ही प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवायची त्यावेळी तिला लहान बहिणीने पाहिले म्हणून तिने हा प्रकार केला.

उपलब्ध माहितीनुसार , मयत मुलींची वय अवघी सात आणि पाच वर्षांची असून आरोपी तरुणीचे वय वीस वर्षे आहे. तिने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. आरोपी तरुणीचे नाव अंजली असे असून घटना घडली त्या दिवशी तिची आई वडील जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेलेले होते आणि ती तिच्या दोन्ही बहिणींसोबत घरी होती.

आरोपी तरुणीने तिच्या प्रियकराला फोन करून घरी बोलावले आणि त्यानंतर ते शारीरिक संबंध ठेवू लागले याच दरम्यान तिला तिच्या दोन्ही लहान बहिणींनी पाहिले. आता त्या आई-वडिलांना सांगतील आणि आपले बिंग फुटेल म्हणून आरोपी तरुणीने दोन्ही बहिणींचा कुदळीच्या साह्याने खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी तिने कुदळ धुवून टाकली आणि त्यानंतर अंगावरील कपडे देखील धुतले. आई वडील घरी आल्यानंतर दोन्ही बहिणीचे मृतदेह वेगवेगळ्या खोलीत आढळले. आरोपी तरुणीने खुनाची कबुली दिलेली असून घटना प्रकरण समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.


Spread the love