महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण सध्या साताऱ्यात समोर आलेले असून नात्याने मावस बहीण असलेल्या एका तरुणीसोबत तिच्या मावसभावाचे प्रेमप्रकरण सुरू झाले. लग्नासाठी त्यांनी घरच्यांना देखील विनंती केली मात्र घरच्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिल्यानंतर स्नेहल नावाच्या या तरुणीचे दुसरीकडे लग्न लावून देण्यात आले त्यानंतर तिचा प्रियकर असलेला दत्तात्रेय हा अस्वस्थ झालेला होता. दोन महिन्यांनी स्नेहल माहेरी परतली त्यावेळी दत्तात्रेय याला भेटण्यासाठी ती गेली.
दत्तात्रेय याच्या मनात तू माझी का होऊ शकली नाहीस असा राग होता म्हणून त्याने ती घरी आल्यानंतर तिच्यावर वार केले आणि तिचा मृत्यू झाल्यानंतर त्याने स्वतः देखील गळफास लावून आयुष्याचा शेवट केलेला आहे. सातारा जिल्ह्यातील वांजोळी गावातील ही घटना आहे. आरोपी व्यक्तीने तिचा खून केल्यानंतर स्वतः देखील गळफास घेतला . स्नेहल वैभव माळी असे खून झालेल्या महिलेचे नाव असून दत्तात्रय सुरेश माळी असे या प्रेमवीराचे नाव आहे . नात्याने दोघे मावस भाऊ बहीण असल्याकारणाने घरच्यांनी लग्नाला नकार दिलेला होता.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी स्नेहल हिचा इतरत्र विवाह लावून देण्यात आला त्यानंतर दोन महिन्यांनी ती माहेरी इथे आणली होती. दत्तात्रय याचे घर तिच्या घरापासून काही अंतरावर होते त्यानंतर दत्तात्रय याने तिला फोन करून भेटण्यासाठी म्हणून बोलावून घेतले . स्नेहल घरी आल्यानंतर त्याने तिच्यावर धारदार शास्त्राने वार केले आणि त्यानंतर स्वतः देखील गळफास घेऊन टाकला. संपूर्ण तालुक्यात या घटनेनंतर प्रचंड खळबळ उडालेली आहे