माझ्याशी लग्न कर नाहीतर.., इंस्टाग्रामच्या ओळखीनंतर रस्त्यात अडवलं अन..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक नागपूर इथे समोर आलेले असून इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर एका तरुणाने अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण करत तिचा विनयभंग केलेला आहे . जर तू माझ्याशी लग्न केले नाही तर तुझा जीवच घेतो असे म्हणत त्याने तिचा विनयभंग केला . कामटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , पीडित मुलीचे वय सतरा वर्ष असून या प्रकरणातील आरोपी असलेला राजीक खान उर्फ रियाज खान ( वय 22 वर्षे नवीन कामटी ) याची इंस्टाग्रामवर या तरुणीसोबत या मुलीसोबत ओळख झालेली होती. फोन नंबर शेअर केल्यानंतर ते एकमेकांशी बोलू लागले मात्र आरोपी रियाज खान याची वर्तणूक चांगली नसल्याची समजल्यानंतर विद्यार्थिनींने त्याच्यासोबत बोलणे बंद केलेले होते.

आरोपीने तिचा वेळोवेळी पाठलाग केला आणि तिला लग्नाची देखील मागणी घातली मात्र तिने नकार दिला त्यानंतर 8 ऑक्टोबर रोजी रात्री पुन्हा एकदा त्याने पाठलाग केला आणि तिला अडवण्याचा प्रयत्न केला. मुलगी आपल्याला दाद देत नाही हे लक्षात आल्यानंतर आरोपी 9 ऑक्टोबर रोजी पुन्हा तिचा पाठलाग करू लागला आणि रस्त्यात डवत त्याने तिला शिवीगाळ केली. भररस्त्यात त्याने तिला मारहाण देखील केलेली असून जर माझ्याशी लग्न केले नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी त्याने तिला धमकी दिली.


Spread the love