शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून एका महिलेचे नाव आणि तिचा फोटो वापरत चक्क इंस्टाग्राम वर बनावट अकाउंट तयार करून या महिलेचे आणखी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आलेली आहे . चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 17 तारखेला हे प्रकरण समोर आलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , 35 वर्षीय महिलेचे इंस्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करण्यात आलेले होते . फिर्यादी व्यक्ती यांना त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने त्यांच्याकडे दहा हजार रुपयांची खंडणी मागितली. आपल्या नावाने फेक अकाउंट तयार करण्याचा प्रकार लक्षात येताच 35 वर्षे महिलेने चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात नाव घेत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिलेली असून पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.