कोर्टासमोर आपली बाजू न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडणाऱ्य वकिलालाच सायबर भामट्यांनी फसवण्याचा प्रकार सोलापूर इथे समोर आलेला असून सोलापूर शहरातील एका 44 वर्षीय वकिलाला सायबर भामट्यानी कॉल करून आधारकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने त्यांची आर्थिक फसवणूक केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , प्रवीण चंद्रकांत निकम ( वय 44 वर्ष ) असे फसवणूक झालेल्या वकिलांचे नाव असून ते सोलापूर शहरातील अभिषेक नगर शरद पवार शाळेजवळ राहतात. सोलापूर जिल्हा न्यायालय इथे ते वकिली करत असून त्यांना तुमचे केवायसी स्टेट बँकेच्या बचत खात्यासोबत जोडून घ्या अन्यथा तुमचे बचत खाते ब्लॉक करण्यात येईल असा मेसेज आलेला होता.
खाते बंद झाल्यानंतर आपली आर्थिक अडचण होईल याची जाणीव असल्याकारणाने त्यांनी पाठवलेल्या मेसेजवर लिंक वर क्लिक केले आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण केली मात्र अवघ्या काही मिनिटाच्या आत त्यांच्या खात्यातून 16,616 रुपये त्यानंतर गायब झालेले होते. झालेला प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी स्टेट बँकेत ईमेल करत तसेच आरबीआयला त्यांचे म्हणणे नोंदवलेले असून सोलापूर पोलीस आयुक्तालयात सायबर शाखेत संपर्क करून तक्रार नोंदवलेली आहे.
सदर खाते सध्या गोठवण्यात आलेले असून बँक खात्यामधून रक्कम काढलेली असल्याकारणाने संशयित मोबाईल धारक प्रल्हाद धुरा आयानगर नवी दिल्ली आणि असद असे आरोपी व्यक्तीचे नाव असून सोलापूर सायबर पोलिसांनी त्याच्या विरोधात तक्रार नोंदवलेली आहे . सदर प्रकरणी सोलापूर पोलीस सायबर शाखा पुढील तपास करत आहे .