‘ बारगर्ल ‘ सप्लायर असणाऱ्या निवृत्त पोलीसाच्या मुलाचेच भाईकडून अपहरण

Spread the love

महाराष्ट्रात एक अजब अशी घटना समोर आलेली असून उल्हासनगर शहरातील वेगवेगळ्या डान्सबारमध्ये नाचण्यासाठी महिला आणि तरुणी सप्लाय करणाऱ्या एका तरुणाचे दरमहा एक लाख रुपये प्रोटेक्शन मनी साठी अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे. विशेष म्हणजे सप्लायर मुलगा हा एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असून मित्रासोबत पार्टनरशिपमध्ये त्याने हा प्रकार सुरू केलेला होता. पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , अजय बागुल असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून याच टोळीतील देवा खेडेकर , कुणाल वसीटा , साहिल भेद हे तीन आरोपी अद्यापही फरार आहेत . तक्रारदार व्यक्ती दुर्गेश कैलास वारे हे उल्हासनगरच्या एका गावातील रहिवासी असून त्याचे वडील सेवानिवृत्त पोलीस आहेत . काहीतरी व्यवसाय करायचा म्हणून दुर्गेश याने डान्सबार मध्ये बार गर्ल पुरवठा करण्याचे काम मित्रासोबत सुरु केले मात्र याच दरम्यान याच परिसरातील एका टोळीचा म्होरक्या असलेला देवा याच्यासोबत प्रोटेक्शन मनीवरून त्याचा वाद झालेला होता.

11 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा दुर्गेश हा उल्हासनगर येथील पॅराडाईज हॉटेलच्या बाहेर उभा असताना देवा तिथे आला आणि जबरदस्तीने त्याला गाडीत बसून कांबा गावाजवळ घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर त्याला हॉकी स्टिकने बेदम मारहाण करत दर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील नाहीतर तुला मारून टाकू अशी धमकी देण्यात आली.

मारहाण झाल्यानंतर दुर्गेश हा घाबरून गेला आणि त्याने अपहरणकर्त्या व्यक्तींना उल्हासनगर येथील एका बारच्या काउंटरवरून तात्काळ तीस हजार रुपये देण्याचे मॅनेजरला सांगितले त्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्याला सोडून दिले मात्र त्यानंतर दुर्गेश याने पोलीस ठाण्यात दाखल होत तीन आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे . पोलिसांनी आतापर्यंत फक्त अजय बागुल नावाच्या व्यक्तीला अटक केलेली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे तर उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.


Spread the love