बाळाच्या भेटीसाठी घिरट्या मारून मारून थकली , व्याकुळ आईचे टोकाचे पाऊल

Spread the love

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण छत्रपती संभाजीनगर इथे समोर आलेली असून तिसरा ही मुलगा झाला म्हणून पतीने त्याला स्वतःकडे ठेवून घेतले आणि त्यानंतर त्याच्या आईला मुलाला पाहण्यास देखील मज्जाव केला त्यानंतर प्रचंड टेन्शनमध्ये आलेल्या बाळाच्या आईने अखेर आत्महत्या केलेली असून तीन जणांच्या विरोधात हरसुल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , प्रियंका अनिल राठोड ( वय 25 वर्ष ) असे मयत महिलेचे नाव असून याप्रकरणी महिलेचा पती अनिल पूनमचंद राठोड , सासरा रामजी सासू शेवंता यांच्यासह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हरसुल पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिलेली आहे.

प्रियंका आणि अनिल यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झालेला होता त्यानंतर त्यांना तीन मुले झाली मात्र तिसरा देखील मुलगाच झाला म्हणून त्यांनी प्रियंका हिचा छळ सुरू केला. तिन्ही मुलांना स्वतःकडे ठेवत त्यांनी प्रियंका हिला हाकलून दिले त्यानंतर ती माहेरी राहत होती.

तब्बल पाच ते सहा महिने आईची मुलांसोबत भेट देखील झालेली नव्हती त्यामुळे आई असलेली प्रियांका अस्वस्थ झाली. 16 ऑक्टोबर रोजी तिने बाळाला पुन्हा भेटण्याचा प्रयत्न केला मात्र तिला बाळ दिसले नाही. आपले बाळ सासरच्या व्यक्तींनी परस्पर विकून टाकल्याचा देखील आरोप माहेरच्या व्यक्तींनी केलेला असून मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दुर्गडी तांडा शिवारात एका लिंबाच्या झाडाला प्रियंका हिने गळफास घेतलेला होता. आरोपी पती याने हे बाळ कुणाला विकलेले आहे याचा देखील तपास सध्या पोलिसांनी सुरू केलेला आहे.


Spread the love