पुण्यात सापळा रचला अन पहिला ‘ हफ्ता ‘ घेतानाच साहेब जाळ्यात

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून गुन्हा दाखल न करण्यासाठी एका महिलेकडून 50 हजार रुपयांची लाच मागण्यात आली त्यापैकी 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सांगवी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक फौजदार यास अटक करण्यात आलेली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकाने ही कारवाई पिंपळे सौदागर पोलीस चौकीत 18 तारखेला केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सुनील शहाजी जाधव ( वय 49 नेमणूक सांगवी पोलीस ठाणे ) असे आरोपी सहाय्यक फौजदाराचे नाव असून तक्रारदार महिलेच्या घराच्या बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट कराळे नावाच्या एका व्यक्तीने घेतलेले होते. वेळेत बांधकाम पूर्ण केले नाही म्हणून तक्रारदार व्यक्ती यांनी कराळे यास बांधकाम साहित्य परत देण्यास नकार दिला आणि काम पूर्ण करा मग साहित्य घेऊन जा असे सांगितले होते.

कॉन्ट्रॅक्टर कराळे यांनी तक्रारदार व्यक्ती यांच्या विरोधात सांगवी पोलिसात तक्रार दाखल केली होती. तुम्हाला आरोपी न करता तसेच गुन्हा दाखल न करण्याच्या बदल्यात जाधव यांनी साठ हजार रुपयांची लाच मागितली आणि त्यानंतर तडजोड करत 50 हजार रुपयांची लाच मागितलेली होती त्यातील पहिला टप्पा घेतानाच त्यांना अटक करण्यात आलेली आहे.


Spread the love