‘ तुझ्या सुंदर चेहऱ्यामागे चेटकीण लपलेली ‘, पतीला न्यायालय म्हणाले की..

Spread the love

महाराष्ट्रात कौटुंबिक कलहाचे एक अजब प्रकरण सध्या नागपूरमध्ये चर्चेत आलेले असून पती-पत्नीत भांडण झाल्यानंतर शब्दांची लाखोली कुठपर्यंत जाते हे या घटनेत समोर आलेले आहे. संतापाच्या भरात पतीने तुझ्या सुंदर चेहऱ्यामागे एक भयानक चेटकीण लपलेली आहे असे म्हणाला त्यानंतर पत्नीने कोर्टात धाव घेतली आणि अखेर या पतीला नागपूर खंडपीठाने चांगला दणका दिलेला आहे.

सदर दांपत्य हे नागपूर शहरातील रहिवासी असून कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानंतर ते वेगळे झालेले आहेत. 25 जुलै 2023 रोजी कुटुंब न्यायालयाने पत्नी आणि तिच्या मुलाला प्रत्येकी तीन हजार रुपये मासिक पोटगी मंजूर केलेली होती त्या विरोधात पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

पतिच्या म्हणण्यानुसार आपल्या पत्नीचे बाहेर विवाहबाह्य संबंध असून जन्माला आलेला मुलगा हा दुसऱ्या पुरुषामुळे जन्माला आलेला आहे असे म्हणत त्याने मुलाचे पितृत्व देखील नाकारले होते सोबतच स्वतःच्या पत्नीला चेटकिन देखील म्हटलेला होता त्यानंतर हायकोर्टाने कायद्याच्या दृष्टिकोनातून पतीचे हे वक्तव्य अनावश्यक असून त्याला काहीच महत्त्व नाही असे पतीला सांगितलेले आहे .


Spread the love