दारूच्या नशेत ‘ तोतया ‘ असल्याचे विसरला , पोलिसांनी बॅकअप देखील पाठवला पण ..

Spread the love

अनेक जण हॉटेलमध्ये गेल्यानंतर मोठ्या मोठ्या बढाया मारतात आणि हॉटेलचालक यांच्यावर पैसे कमी करण्यासाठी तसेच बिल बुडवण्यासाठी दमदाटी करतात मात्र एका व्यक्तीला हा प्रकार चांगलाच महागात पडलेला असून आपण पोलीस अधिकारी आहोत असे सांगत त्याने हॉटेल चालकाला त्रास देण्यास सुरू केले. प्रकरण मारहाणीपर्यंत आले आणि अखेर आरोपी व्यक्तीने हॉटेल चालकाच्या विरोधात तात्काळ इकडे बॅकअप पाठवा अशी माहिती दिलेली होती.

मुंबईतील हे प्रकरण असून मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास बांगुरनगर पोलिसांना नियंत्रण कक्षामधून एक फोन आला त्यामध्ये गोरेगाव पश्चिम येथील ओशिवारा बेस्ट बस डेपो समोर स्वामी बारमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याला बॅकअपची गरज आहे असे सांगण्यात आले. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे तात्काळ तिथे पोहोचले त्यावेळी त्यांना निलेश पोखरकर नावाचा इसम मद्यधुंद अवस्थेत वाद घालत असल्याचे दिसून आले.

बार मॅनेजरकडे त्यांनी अधिक चौकशी केली त्यावेळी आरोपी निलेश पोखरकर हा गेल्या काही तासांपासून दारू पीत असल्याचे सांगितले मात्र बिल देण्यास त्याने नकार दिला त्यावेळी त्यांनी आपण पोलीस आहोत असे देखील म्हटले. मॅनेजर समोर त्याने ओळखपत्र दाखवले आणि पैसे मागितले तर तुलाच अटक करून घेऊन जाईल अशी देखील धमकी त्याने दिली होती . मॅनेजरने त्यानंतर विनंती केली मात्र निलेश काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याने मॅनेजरची कॉलर पकडली आणि मॅनेजरला मारहाण देखील केली.

दारूच्या नशेत असल्याकारणाने आपण तोतया पोलिस आहोत याचे त्याला भान राहिले नाही आणि त्याने पोलिसांच्या आपतकालीन क्रमांकावर फोन केला . आपण कर्तव्य बजावत असताना आपल्यावर हल्ला झालेला आहे असे सांगितल्यानंतर पोलिसांनी देखील मागील पुढील विचार न करता तात्काळ त्याच्यासाठी मदत पाठवली. पोलिसांना माहिती देताना त्याने आपण दहशतवाद विरोधी पथकाशी संलग्न असल्याची माहिती दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर तो तोतया असल्याचे लक्षात आले. सद्य परिस्थितीत निलेश याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केलेली आहे


Spread the love