पुण्यातील ‘ त्या ‘ घटनेत चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Spread the love

पुणे शहरात काही वर्षांपूर्वी संतोष माने प्रकरण चांगलेच गाजलेले होते त्यानंतर अशाच स्वरूपाचा प्रकार पुन्हा पुण्यात समोर आलेला असून पीएमटी च्या बस चालकाने दारू पिऊन बस उलटी चालवली आणि त्यामध्ये रस्त्यात आलेल्या दहा-पंधरा गाड्यांना उडवून दिले. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी बसमध्ये तब्बल पन्नास प्रवासी होते.

उपलब्ध माहितीनुसार , निलेश सावंत असे बस चालकाचे नाव असून पुण्यातील प्रसिद्ध सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकात हा प्रकार सकाळी अकराच्या सुमारास केलेला आहे . बसमध्ये 50 प्रवासी बसलेले असताना देखील त्याने दारूच्या नशेत बस रिव्हर्स गिअर मध्ये टाकली आणि त्यानंतर त्याने दहा ते पंधरा गाड्या उडवल्या. निलेश सावंत याने हा प्रकार का केला याचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.

कृष्णा जाधव नावाच्या इसमाने स्वतःच्या जीवाची परवा न करता निलेश सावंत याला पकडले आणि त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेला असून निलेश सावंत याने हा प्रकार का केला याचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.


Spread the love