पुण्यात नवऱ्याला नखे खाऊ घालून जादूटोण्याचा प्रकार , कॉल रेकॉर्डिंगमुळे उघडकीस

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून नवऱ्याला नखे खायला घालून पतीवर जादूटोण्याचा प्रयोग केल्याचे समोर आलेले आहे . पतिने सासू-सासऱ्यांना हा प्रकार सांगितला त्यानंतर सासू-सासरे आणि इतर नातेवाईकांनी पतीला बेदम मारहाण केलेली आहे काळेवाडीतील तापकीर चौक इथे शुक्रवारी ही घटना घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , योगेश शिवाजी आपुणे ( वय 30 वर्ष राहणार काळेवाडी ) यांनी याप्रकरणी वाकड पोलिसात फिर्याद दिलेली असून सासरा गोपाळ लिंबराव शिंदे( वय 55 ), सासू वय 50 , मेव्हणा अनिल गोपाळ शिंदे ( वय 25 ), अक्षय गोपाळ शिंदे ( वय 23 ) शिवाजी राऊत ( वय 34 राहणार लोणी काळभोर ), इतर एक महिला आणि योगेश याची पत्नी ( वय 27 वर्ष ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

योगेश यांचे पत्नीसोबत कौटुंबिक कारणावरून वाद होते त्यामुळे पत्नीने परिसरातील एक जादूटोणा करणारा बाबा बाबाजी शेख याच्याशी फोनवर बोलून जादूटोण्याबद्दल विचारणा केली त्यावेळी त्यावेळी या बाबाने फिर्यादी यांना जेवणात नखे आणि इतर काही वस्तू खाऊ घालण्याचा सल्ला दिला. त्यांच्यामधील कॉल रेकॉर्डिंग पतीने ऐकले त्यानंतर त्यांनी सासू-सासरे यांना याबद्दल सांगितले मात्र तरीही काहीही फरक झाला नाही . फिर्यादी यास नखे खाऊ घालणे मायाजाळ नावाची वस्तू व इतर वस्तू पाण्यात मिसळून खाऊ घालणे असे प्रकार आरोपींनी केले.

फिर्यादी यांनी विरोध केला असता सासरा गोपाळ शिंदे याने घरी येऊन फिर्यादी यास मारहाण केली आणि मेहुण्याने देखील फिर्यादी यांना मारहाण केली. सासूने फिर्यादी यांच्या डोक्यात मिरची पावडर टाकली आणि सर्व आरोपींनी फिर्यादी यांना जिथे कुठे तू दिसशील तर तिथे तुला आम्ही मारून टाकू अशी धमकी दिली . बायकोने देखील त्यानंतर आई-वडिलांची बाजू घेत जर आमच्या विरोधात पोलिसात तक्रार केली तर मी आत्महत्या करेन आणि तुला अडकवून टाकेल अशी म्हणाली . पोलिसांनी मेव्हणा अनिल शिंदे याला अटक केलेली असून वाकड पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत


Spread the love