नवऱ्याचं ‘ लफडं ‘ बाहेर काढल्यापासून त्रास , विवाहिता म्हणाली तिच्या सांगण्यावरून

Spread the love

महाराष्ट्रात एक अजब प्रकार सध्या सोलापूर जिल्ह्यात समोर आलेला असून आपल्या नवऱ्याचे इतर महिलेसोबत असलेले अनैतिक संबंध उघड केल्यानंतर नवऱ्याकडून आपल्याला शारीरिक आणि मानसिक छळ दिला जात आहे अशी तक्रार सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्यात देण्यात आलेली आहे. पतीसोबत चार जणांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , कार्तिक रेड्डी , सासू सुनंदा रेड्डी , ननंद सुधा कुमार आणि मानलेली ननंद दीपा ( सर्वजण राहणार भाग्योदय हाऊसिंग कॉलनी नई जिंदगी सोलापूर ) अशी गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तींची नावे असून फिर्यादी महिला यांचा कार्तिक याच्यासोबत एप्रिल 2017 मध्ये विवाह झालेला होता. काही दिवसांतच आपल्या पतीचे इतरत्र संबंध असल्याचे पत्नीच्या लक्षात आले.

पतीला सदर प्रकरणी पत्नीने पतीला जाब विचारला त्यानंतर पतीसोबत सासरच्या मंडळींकडून तिचा छळ करण्यास सुरू झाले. तिला उपाशी ठेवणे , एकटीला काम करावयास लावणे , लग्नात मानपान आणि हुंडा मिळाला नाही म्हणून त्रास देणे माहेरच्या लोकांविषयी अपशब्द उच्चारणे असे प्रकार सासरच्या व्यक्तींकडून करण्यात आले असे फिर्यादी यांचे म्हणणे आहे.

चारही आरोपींनी त्यानंतर श्रीमंत घरात एक मुलीशी लग्न केले असते तर मोठ्या प्रमाणात हुंडा मिळाला असता , सोने मिळाले असते. तू आम्हाला व्यवसाय करण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये असे म्हणत देखील दमदाटी करण्यास सुरुवात करण्यात आली. जिच्यासोबत अनैतिक संबंध आहेत त्या महिलेच्या सांगण्यावरून फिर्यादी यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करत वैवाहिक जीवन आरोपीने उध्वस्त केलेले आहे असे देखील फिर्यादी यांचे म्हणणे आहे.


Spread the love