पाच जणांवर गुन्हा दाखल , ससूनच्या डॉक्टरांच्या लक्षात आलं की..

Spread the love

पुण्यात एक धक्कादायक असा प्रकार उघडकीस आलेला असून चक्क आई-वडिलांनी अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिला होता. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ससून रुग्णालयात हा प्रकार उघडकीस आलेला आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यामध्ये ती गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी पोलिसात माहिती देण्यात आली.

सदर प्रकरणी पोलिसांनी मुलीचे आईवडील , तिचा पती , सासू-सासर्‍यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला असून पोलीस शिपाई वैशाली पुंडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिलेली आहे. आरोपींच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच पतीच्या विरोधात पॉक्सोचे कलम देखील वाढवण्यात आलेले असून येरवडा भागातील या मुलीचा विवाह दोन वर्षांपूर्वी आई-वडिलांनी लावून दिलेला होता.

आई-वडील आणि सासू-सासरे तसेच पती या सर्वांना ही मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती होते तरी देखील हा विवाह लावण्यात आला. सासरी गेल्यानंतर पतीने शारीरिक संबंध ठेवल्यानंतर या मुलीला दिवस गेले त्यानंतर बाळंतपणासाठी ती माहेरी आली म्हणून तिला रुग्णालयात नेण्यात आलेले होते. सदर महिला ही अल्पवयीन असल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


Spread the love