महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील मकोडी इथे समोर आलेले असून अनैतिक संबंधातून बायकोचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार 19 ऑक्टोबर रोजी दुपारी घडलेला आहे . आरोपीने त्यानंतर बनाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, विठ्ठल यादव सांगळे ( वय 32 वर्ष ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याचा कल्पना नावाच्या एका तरुणीसोबत विवाह झालेला होता . त्याला दोन अपत्य असून मुलगा आठ वर्षांचा तर मुलगी सहा वर्षांची आहे. काही दिवसानंतर कल्पना हीचे गावातील भास्कर उर्फ बळी अश्रुबा खरात ( वय 27 राहणार मकोडी ) याच्यासोबत अनैतिक संबंध सुरू झाले. कल्पना ही दोन वेळा त्याच्यासोबत पळून देखील गेली मात्र पुन्हा नवऱ्याकडे नांदायला आलेली होती.
आपल्या बायकोकडून सतत पळून जाण्याचा प्रकार होत असल्याने या प्रकरणाची गावकऱ्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती त्यामुळे विठ्ठल हा वैतागून गेलेला होता. घटना घडली त्यादिवशी विठ्ठल घरी आला त्यावेळी त्याला पत्नी आढळून आली नाही म्हणून त्याने शोध घेण्यास सुरू केले त्यावेळी त्याच्या घरापाठीमागच्या शेतात भास्कर उर्फ बळी खरात आणि कल्पना हे दोघे आक्षेपार्ह परिस्थितीत आढळून आलेले होते.
कल्पनाचा पती आल्याचे पाहून बळी तिथून पळून गेला त्यानंतर विठ्ठल याने पत्नीला राहत्या घरी आणले आणि वाद झाल्यानंतर तिचा गळा आवळून खून केला . घटनेनंतर काही वेळात आरोपीने दिशाभूल केली त्यामुळे प्रियकर असलेला भास्कर उर्फ बळी खरात याच्यावरच खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता मात्र पोलीस ठाण्याचे सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक चित्तरंजन टेमकेवाढ यांनी तपासाची चक्री फिरवली आणि पतिवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरू केले.
आरोपी हा बनाव करत आहे असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला ताब्यात घेतले त्यावेळी त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिलेली आहे . आरोपी पती विठ्ठल यादव सांगळे याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 302 449 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.